- एक फूल ….दोन हाफ
यशवंतराव तस भारदस्त व्यक्तिमत्त्व अनेक वर्षे व्यायामाने कमावलेले शरीर आता ७५ वर्षाचं झालं होतं
मागच्या 3 वर्षांपूर्वी मुलगा सून नातवंड सगळा कसा दृष्ट लागेल असा संसार.
शहराच्या चौकात मध्यवर्ती ठिकाणी श्री दत्तकृपा हॉटेल
मागील दोन पिढ्यापासून मिसळ,इडली ,डोसा, शाबुवडा साठी पंचक्रोशीत प्रसिध्द…. रोजचा १०-१५ हजाराचा गल्ला
पण कोरोना आला आणि सगळं उलट चक्र फिरलं….
चाळिशीतील मुलगा महेश आणि पासष्टीची त्याची आई गोदाक्का यशवंतराव नी गमावल्या
सून आणि २ नातवंड यांची जबाबदारी घेऊन तात्या (यशवंतराव)पुन्हा हॉटेलात गल्ल्यावर बसू लागले
आयुष्य असच असत …तिथं थांबून चालत नसत
माझं ही अधून मधून तात्याकडे जाण असायचं पण तात्या थोडे अबोल झाल्यासारखे वाटायचे
तुम इतना क्यो मूस्कुरा रहे हो…क्या गम है जिसको छुपा रहे हो
“तात्या काय निवांत बसलाय” हॉटेलात जाताच माझा प्रश्न
तसा माझ्या व तात्यांच्या वयात साधारण २५ वर्षाचं अंतर पण मैत्रीला वय नसत ते मला मुलासारखेच समजायचे
दुपारचं हॉटेल जरा निवांत असायचं…….. तसा ही गेल्या 3 वर्षात व्यवसाय टप्प्या टप्प्याने कमी होत होता
“ये माधव …बस” तात्या गल्ल्याला बंद करत माझ्या टेबलसमोर बसले
” जगू ……माधवला स्पेशल आण रे”
तात्या टेन्शन मध्ये दिसताय
“खरय माधव ….मागच्या ३ वर्षात सगळं उलट लागलं की रे…
आपली माणसं गेली…
व्यवसायाला घरघर लागली …
माझ्यामाघारी हे पिढीजात हॉटेल बंद होणार बहूतेक
कुणी करणी केलीय कि कुणाची दृष्ट लागली कळत नाही रे…
स्वामी समर्थाच्या फोटो कडे डबडबलेल्या डोळ्यांनी पहात तात्या म्हणाले माझ्या ही डोळ्यात पाणी आलं
“तात्या होईल सगळं ठिक …मला तुम्ही मुलासारखं समजता न”
हो रे माधव ..म्हणून तर मनातलं बोलतोय
” तात्या खर सांगू का ?…… जग फार झपाट्याने बदलतंय हो
पूर्वीची नाती ओळखी ग्राहक सगळं बदललंय
प्रचंड जीवघेणी स्पर्धा ,स्थानिक स्पर्धा,ऑनलाइन फूड झोमॅटो, स्वीगी ,असंख्य पर्याय ग्राहकाला मिळालेत”
“अरे….. पण यातील मला तर काहीच कळत नाही मग कस होणार ” तात्यांची चिंता रास्त होती
तात्या आपल्याला इच्छा असो अगर नसो पण या Digital India बरोबर जावंच लागणार
आणि काळजी कशाला करताय मी आहे न तुमचा मुलगा Digital Marketing गुरू सगळं सुरळीत करून देईन…..
अरे पण फ़ार खर्चिक नाही न
नाही हो तात्या …तुमच्या चहा पेक्षा ही स्वस्त आहे अगदी १ ₹ प्रति दिवशी वार्षिक ३६५ रु
बर झालं रे तू भेटलास आज आता मी निवांत मरायला मोकळा
तात्या अस नाही हं बोलायच
१०० वर्ष जगायचं तुम्ही आणि अथर्वला म्हणजे तुमचा नातू झक्याला ऑफिसवर पाठवा मी शिकवतो त्याला
Digital Marketing
शिकव रे शिकव त्याला १२ वी झालाय तो
त्याला उद्याच द्या पाठवून माझं ही कराडच्या बिजनेस ला उभारी द्यायचं काम सुरू आहे
Top Business Listing Website
माधव हे काय नवीन ?
तात्या तुम्हाला लवकर नाही कळणार
पण कराड चे सर्व व्यवसाय एकाच छत्राखाली आणणारा ना नफा ना तोटा तत्वाचा प्रकल्प आहे इथं नाव नोंदवलं की आपला व्यवसाय जगभर,24तास दिसतो,नवीन ग्राहक येतात आणि बरच काही …
बर बर स्वामी तुला उदंड यश देवोत
थरथरणारा हाथ क्षणभर स्वामींचाच वाटला जणू काही ते फोटोतून आशीर्वाद देत होते पोस्ट आवडली तर जरूर शेअर कॉमेंट करा आमच्या सोशल मीडिया ग्रुपला नक्की फॉलो करा धन्यवाद
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
©दिपक फडणीस
Digital Guru 🎨
Redefine Your Business
Leave a Reply