सकाळी १० च्या ठोक्याला अथर्व ऑफिसच्या दारात उभा होता
“माधव काका आत येऊ का ?”
“अरे सोनू ,ये ये परवानगी कसली मागतोय” आम्ही प्रेमानं अथर्व ला सोनू म्हणायचो महेशला सोनू नाव आवडायचं
महेश गेला आणि सगळं…
विचारचक्र जाणीवपूर्वक थांबवलं
“तात्यांनी …मक्याचा चिवडा दिलाय ..तुला आवडतो म्हणून”
“अरे वा आण आण इकडं”
त्यानं चिवड्याची पिशवी टेबलावर ठेवली
मक्याचे पोहे,कडीपत्ता, तळलेले शेंगदाणे…आवडतो मला फार
सोनू समोरच्या खुर्चीत बसला
१७-१८ वर्षाच कोवळं पोर. लाडात वाढलेलं
पण बाप गेला आणि सोबत लाड पण
“काय खाणार ?”
“नको काका खाऊन आलोय …ते तात्या म्हणले तुम्ही काहीतरी शिकवणार म्हणाले…म्हणून आलोय”
वेळ सगळं शिकवते Priority कळायला लागतात अकाली जबाबदारी आली की माणूस हतबल तरी होतो किंवा होतकरू तरी होतो
त्याच्या डोळ्यात आर्जव होत मी ही 5 वर्ष Flashback मध्ये गेलो
आज ही बॅड पॅच आठवला की अंगावर काटा येतो मोठं आर्थिक नुकसान, जवळच्या व्यक्तीच निधन,शारीरिक व्याधी
आणि संकट यायला लागली की एकटी येत नाहीत मात्र जाताना हळूहळू एकटी जातात
जगाला काही नसतं तुमच्या संकटांच
त्यात ही त्याना काही तरी हवं असत
दुरावलेले मित्र,ओळख न दाखवणारे नातेवाईक, आणिक प्रचंड एकाकी आपण
आपलं दुःख आपलं असत त्याची जबाबदारी आपलीच असते
कहा गम खोल के बैठे हो यार
ये तो नमक का शहर है
काका…
मी भानावर आलो
सोनू करायचं का सुरू ?
हो मी वही पण आणलीय
छान पण आज आपण फक्त चर्चा करू चालेल
हो चालेल तुम्ही म्हणाल तसं
मला सांग marketing बद्दल तुला काय माहीत आहे
आहे न काका…ती वस्तू घरोघरी जाऊन विकायचं आणि जोड्या लावायच्या एकाखाली एक मग खूप पैसे मिळतातं
मी मोठ्यांदा हसलो खूप हुशार आहेस की तू तुला जे माहीत आहे ते अर्धसत्य आहे आणि अर्ध सत्य खूप धोकादायक असत तुला माहीत आहे न पेशवाईत ध चा मा झाला आणि नारायणराव मारला गेला
चल मी तुला लॅपटॉप वर समजावतो
मी Powerpoint सुरू केलं
Sales Vs Marketing
बघ मार्केटिंग व सेल्स या दोन वेगळ्या पण एकमेकांशी संलग्न संकल्पना आहेत
सेल्स हा मार्केटिंग चाच एक भाग आहे
मार्केटिंग म्हणजे एखादी सेवा किंवा वस्तू बाजारात आणताना त्याची केलेली आखणी
Product Demand
Competition Analysis
Product Development
Promotion, Branding
Distribution Strategies
Blue or Red Ocean
Customer Reviews
Brand Retention
असे अनेक पैलू यात असतात
सोनू आ वासून माझ्याकडे पहात होता
मला ही कळलं साहेबांच्या डोक्यावरून गेलंय
चूक माझीच होती मी MBA स्टुडंटला शिकवत नव्हतो
चल तुला थोडक्यात समजावतो
तुमचा हॉटेलचा व्यवसाय बरोबर
हो बरोबर
तुमचं नाव हा तुमचा ब्रॅड …त्याला मोठं कसं करता येईल तर उत्तम चव ,स्वच्छता, वाजवी दर,ग्राहकांशी आपुलकी,तो ग्राहक परत परत यावा म्हणून केलेलं सर्व प्रयत्न म्हणजे Marketing. समजलं
हो काका …आणि सेल्स म्हणजे
सेल्स म्हणजे प्रत्यक्ष विक्री
या मध्ये जास्तीत जास्त वस्तू किंवा सेवा विक्री वर भर असतो
म्हणजे घे वाणी दे वाणी समजलं का
दोन्हीत मूलभूत फरक आहे
Sale Focus on Maximize Product or Service Part
Marketing Focuses on resolving customer problem and giving them best value for Money
एवढं जरी तुला कळलं तरी बस्स
आपल्याला Digital Marketing काय हे शिकायचं आहे
आज बस्स तुला जे मी शिकवलं त्यावर Youtube व गुगल वर जाऊन अजून माहिती शोध नोट्स काढ म्हणजे तुला पुढचे विषय सहज समजतील
हा महासागर आहे मी पण रोज शिकतच असतो
आपण दोघे ही विद्यार्थी च आहोत
सोनूच्या चेहऱ्यावर नवीन शिकल्याचा आनंद होता
काका आजच नोट्स काढतो उद्या आलो तुला दाखवीन निघू का मी
वैष्णवीला घेऊन मंडईत जायचय
अथर्व झटपट उठला दरवाज्याकडे वळाला
मला मात्र त्याच्यात छोटा महेशच दिसला
जणू तो आम्हा दोघांना आशीर्वाद देत होता
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
धन्यवाद
@Deepak Phadnis
Digital Guru
(ता क पोस्ट आवडल्यास जरूर शेअर करा ब्लॉग व्हॉट्सअप ला फॉलो करा)
Leave a Reply