Reastaurant

आपल्याकडे एक प्रथा आहे जेव्हा कोणताच बिजनेस जमत नाही ….

तेव्हा लोक हॉटेल व्यवसाय किंवा वडापाव व्यवसाय सुरू करतात 

Hotel Association of India च्या एका पाहणी नुसार 

भारतात 70% हॉटेल व्यवसाय सुरुवातीच्या 3 ते 5 वर्षात बंद होतात 

चला तर जाणून घेऊया व्यवसाय बंद होण्याची नेमकी कारण व त्यावरील रामबाण उपाय….

१.स्पर्धात्मक बाजारपेठ Competition

आजच्या मितीला भारतात सरासरी 2 कोटी पेक्षा जास्त लोक या किंवा तत्सम व्यवसायात आहेत.

 रोज नवे नवे स्टार्टअप जन्माला येत आहेत…

 अगदी तुमच्या शहरात पहा …

मागील 5 वर्षात किती नव्याने व्यवसाय सुरू झाले आहेत 

या स्पर्धात्मक जगात आपला व्यवसाय तग धरण्यासाठी निरीक्षण परीक्षण सर्वेक्षण करणे जरुरीचे आहे

२.व्यवसायाची जागा Location

हा अत्यंत महत्वपूर्ण पॅरॅमिटर मानक आहे .समजा तुम्ही अशा ठिकाणी व्यवसाय सुरु केला आहे जिथे लोकांची वर्दळ खूप कमी आहे त्या ठिकाणी आवर्जून गिऱ्हाईक येणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या जागेची हायजीन उदा दुर्गंधी युक्त ठिकाणे ,नाले गटारी ,मासळी बाजार या ठिकाणच्या व्यवसायात अनेक अडचणी निर्माण होतात उत्तम ग्राहक मिळवणं खूप अवघड जात

शाकाहारी लोकांच्या विभागात नॉन व्हेज दुकान टाकून फार फायदा नसतो

 

३ नियोजन अभाव Lack of Planning

कोणत्याही मार्केट रिसर्च शिवाय व मायक्रोप्लॅनिंग शिवाय व्यवसायात उडी घेणं धाडसाचं आहे 

रोज किती सेल होईल ,किती खर्च होईल नफ्याचे गणित ,कामगार नियोजन 

इत्यादी बाबीवर अभ्यास करणे व सतत शिकत राहणं गरजेच असत

४.गुणवत्ता Taste & Quality

हा मुद्दा या व्यवसायाचा आत्मा आहे

 इतर मुद्दे किती ही उत्तम असतील पण हा मुद्दा जर कुमकवत असेल तर …

तुम्हाला कुणी ही वाचवू शकत नाही
उत्तम चव,पौष्टिकता ,दर्जेदार कच्चा माल,स्वच्छता, वेगळेपण या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे

Food

५.आर्थिक नियोजन Financial Planning

अनेकदा व्यवसायिक जास्त नफाच्या उद्देशाने ….

निकृष्ट दर्जाचा माल वापरतात आणि ग्राहक कायमस्वरूपी गमावतात
तसेच मोठेपण दाखवण्यासाठी अनावश्यक खर्च करतात 

ग्राहक आपल्याकडे फक्त दर्जेदार उत्पादनाकरिता (Value For Money) येत असतो हे सदैव लक्षात ठेवा

६.शासकीय परवानग्या Govt. Compliances

आपल्या व्यवसायाला लागणाऱ्या सर्व शासकीय परवानग्या प्राथमिकतेने तुमच्याकडे असणे गरजेचे आहे 

जसे FDI असेल Food सिक्युरिटी लायसन्स किंवा ISO 14000 EMS सारखी सर्टिफिकेट तुमची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढवतात

७.मार्केटिंग व जाहिरात Marketing & Advertising

हा जरी शेवटचा मुद्दा असला तरी सर्वात महत्वाचा आहे
जो नही दिखेगा वह… नही बिकेगा 😢
इतर बाबीवर लाखो रुपयांचा खर्च करणारा व्यवसायिक इथं मात्र हात आखडता घेतो
तुमच्या मालाची जाहिरात नाही झाली तर …..

त्याची विक्री होणार नाही ….

विक्री नाही तर नफा नाही
नफा नाही तर व्यवसाय जिवंत राहणार नाही
जाहिरात खर्च हा खर्च नसून भविष्याची गुंतवणूक असते
म्हणून तर उन्हाळा आला की थंडा मतलब.…सुरू होत
दिवाळी आली की…
उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ आली सुरू होत
दररोज उठल्यापासून दात कशाने घासायचे ते रात्री गुड नाईट पर्यंत आपल्या मेंदूत पॅसिव्ह प्रोग्रामिंग केलं जातं

पारंपरिक जाहिरात माध्यमे जसे न्यूज पेपर ,माहिती पत्रके,रेडिओ FM, TV खूप महाग व आवाक्या बाहेरची आहेत

मात्र डिजिटल मार्केटिंग तुलनेनं अधिक स्वस्त ,नेमकं ,आणि प्रभावी माध्यम आहे
डिजीटल साक्षर व्हा

प्रा.दिपक फडणीस 📞9834575056

M.sc., MBA, PGDCA, PGDMM.
25 Yrs Corporate MNC Experience
आंतरराष्ट्रीय विपणन विषयातील अनुभवी व्यक्ती आहेत

About Author

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *