Top 5 Free Hospitals in Karad

Top 5 Free Hospitals in Karad

मोफत उपचार देणारी कराड मधील ५ नामांकित हॉस्पिटल

आजकाल आजारी पडणं म्हणजे स्वतःच दिवाळ वाजवून घेण्यासारख आहे.पूर्वी वैद्यकीय व्यवसाय ही सेवा होती पण आता तो पैसे छापण्याचा व्यवसाय झाला आहे. सर्वसामान्य रुग्ण योग्य उपचार मिळत नसल्याने सरकारी रुग्णालयात जात नाहीत. खाजगी रुग्णालये सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेली आहेत.
लॅबोरेटरी खर्च,निदान खर्च ,उपचार ,औषधे हा खर्च प्रचंड असतो त्यामुळे अनेक जण उपचारा अभावी वंचित राहतात. 

मात्र आता काळजी करण्याचे कारण नाही .आपल्याकडे जर रेशनकार्ड (पांढरे सोडून) व आधारकार्ड असेल तर आपण पुढील नावाजलेल्या इस्पितळात महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना (MJPAY)अंतर्गत संपूर्ण मोफत उपचार मिळवू शकता.. चला थोडक्यात माहिती जाणून घेवू या.

mjpay

१. महत्वाची माहिती (MJPAY)

 

योजनेची माहिती तपशील 
१. योजनेचे नाव महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना 
२.योजना सुरवात (सुधारित )१ जुलै २०२० 
३. लाभार्थी प्रकार रेशनिंग कार्ड -केशरी पिवळी अंत्योदय अन्नपूर्णा – पांढरे (मराठवाडा फक्त )
४. कुटुंब वार्षिक आरोग्य विमा रक्कम 5,00,000 (५ लक्ष रु )
५.आजार सवरक्षण १२०९ आजार (सर्व आजारं )
६. आवश्यक कागदपत्रे रेशन कार्ड + आधार कार्ड 
७. वैद्यकीय सुविधा औषधे ,उपचार ,शस्त्रक्रिया ,रक्त ,निदान x Ray ,डॉ व नर्स फी ,ICU , Oxygen सर्व खर्च 
८. प्रवास खर्च मिळतो का ?एस.टी प्रवास एक बाजूचा 
९. जेवण सुविधा मिळते का ?रुग्णांना मोफत 
१०. मृत्यू झाल्यास शववाहिका मिळते का ?मोफत घरा पर्यन्त 
११. सुधारित शासन निर्णय प्रत क्लिक करा 👈

२. मोफत सेवा या खाजगी रुग्णालयात उपलब्ध

  •  १. कृष्णा हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च 

  • मलकापुर कराड

  • आरोग्य मित्र संपर्क 9673420441

  • २. सह्याद्रि हॉस्पिटल प्रा. लि.. 

  • वारुजी फाटा 

  • आरोग्य मित्र संपर्क 9673338222 

  •  ३. के एन गुजर हॉस्पिटल 

  • S.T. स्टँड जवळ  कराड

  • आरोग्य मित्र संपर्क 9763999704

  • ४. श्रद्धा एरम  हॉस्पिटल 

  • कृष्णा नाका जवळ  कराड

  • आरोग्य मित्र संपर्क 

  • ५ . कोळेकर  हॉस्पिटल 

  • शनिवारपेठ   कराड

  • आरोग्य मित्र संपर्क 9225211777

आपणास ही माहिती उपयुक्त वाटत असल्यास आपल्या व्हाट्स अप ग्रुप फेसबुक मित्र नातेवाईक यांना जरूर पाठवा. उपचारावरील लाखो रुपये वाचवून रुग्णांना जीवदान द्या 

आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या 

About Author

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *